6 May 2024 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Aadhaar Card Alert | तुमच्या आधारकार्डचा कोणी गैरवापर करताच लगेच ई-मेलआयडी आणि फोन नंबरवर येणार अलर्टचा मॅसेज

Aadhaar Card Alert

Aadhaar Card Alert | भारतातील नागरिक असल्याची ओळख पटवून देणारे आधारकार्ड आज अनेक ठिकाणी विचारले जाते. यात तुमच्या नोकरीपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी असलेलल्या सेवांचा लाभ घेताना आधारकार्ड मागितले जाते. त्यामुळे त्याची कधी कुठे गरज पडेल हे सांगता येत नाही. मात्र याच आधार कार्डचा वापर करुण अनेक व्यक्तींची आर्थिक फसवणूक झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र ही फसवणूक फक्त एवढ्यावर थांबलेली नाही. यात अवैध कामांमध्ये देखील तुमचे आधारकार्ड वापरण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहाला हवे.

आता पर्यंत तुम्ही स्वत: किती ठिकाणी आधारकार्ड वापरले आहे हे तुमचे तुम्हाला देखील सांगता येणार नाही. त्यामुळे कोण आपल्या आधारकार्डचा गैरवापर करत आहे हे ओळखने कठीण आहे. मात्र आता तुम्हाला एका तंत्रज्ञानाने तुमचे आधारकार्ड कोणी, कधी, कसे वापरले आहे हे समजेल. यात लिंक असलेल्या क्रमांकावर तुम्हाला मॅसेज मार्फत अलर्ट दिला जाइल. जेव्हा तुमचे आधारकार्ड वापरले जाईल तेव्हा हा मॅसेज येणार आहे.

असे करा आधार लिंक
यूआयडीआयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहिती नुसार तुम्हाला आधी तुमच्या जवळच्या आधार केंद्रात जावे लागेल. तेथे तुम्हला तुमचे आधारकार्ड इमेलआयडी आणि फोन नंबरला लिंक करुण मिळेल. जेव्हा तुम्ही तुमचे आधारकार्ड लिंक कराल तेव्हा त्याची माहिती आधार केंद्रात https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या संकेतस्थळावर मिळेल.

१० वर्षांनंतर आधारकार्ड अपडेट करा
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्वांना आधारकार्ड अपडेट करण्याचे सल्ले दिले आहेत. ज्यांचा युनिक आयडी १० वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करायला हवे. यात तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा या सर्व गोष्टी बदलण्याची गरज आहे. जर तुम्हाला ऑफलाइन पध्दतीने अपडेट करणे शक्य नसल्यास तुम्ही ऑनलाइन पध्दतीने देखील ते करु शकता. यासाठी मायआधार हे पोर्टल तुमची मदत करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Aadhaar Card Alert message will come immediately when someone is misusing your Aadhaar card 19 October 2022.

हॅशटॅग्स

Aadhaar Card Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x