11 May 2025 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

विधानसभा: राजस्थानमध्ये आदित्य ठाकरेंकडे मतदारांचं दुर्लक्ष, प्रचार वाया गेला

जयपूर : शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष बनण्याचा ध्यास घेतला खरा, परंतु सर्वच ठिकाणी अपयशाची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरलेले आदित्य ठाकरे यांना पूर्णतः अपयश आले आहे. इथल्या मतदारांनी मतदान करताना शिवसेनेला साधं विचारात सुद्धा घेतले नसल्याचं दिसतं आहे.

शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष बनवून देशभर पक्षविस्ताराची जवाबदारी स्वीकारणाऱ्या आदित्य ठाकरेंना राजस्थान विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आल्याचे दिसत आहे. राजस्थानमधील ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तिथं जाऊन आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. तसेच प्रचारादरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन थेट आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं.

‘क्या मांगे राजस्थान; तीर कमान-तीर कमान’, असा नारा त्यांनी प्रचार सभेत दिला होता. परंतु इथल्या शिवसेनेच्या अवस्थेवरून शिवसेनेला स्थानिक मतदाराने पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचे चित्र निकालाअंती समोर येते आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या