11 May 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

भंडारा: अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला

भंडारा : भंडाऱ्यातील अभयारण्यात आज सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. सकाळच्या सुमारास पर्यटक तसेच गाइड यांना सफारीदरम्यान हा वाघ मृत अवस्थेत आढळला. दरम्यान, वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या मृत्यूचं मूळ कारण सुद्धा अजून अस्पष्ट आहे.

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढची अधिक चौकशी सुरु असल्याचे समजते. विशेष म्हणजे याच नर वाघाचे दर्शन कालसुद्धा पर्यटकांना झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय हा वाघ स्थलांतरीत होऊन याठिकाणी आला आणि आधीपासून असलेल्या वाघांसोबत संघर्ष होऊन हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वन्यजीवप्रेमी लावत आहेत. परंतु, खरं कारण अजून पुढे येऊ शकलेलं नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या