10 May 2025 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Total Gas Share Price | तज्ज्ञांकडून BUY कॉल, अदानी टोटल गॅस शेअर फोकसमध्ये, अपडेट नोट करा - NSE: ATGL Adani Green Share Price | 30 टक्के कमाईची संधी, या मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ADANIGREEN Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सध्या विरोध करणाऱ्यांना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती

Sharad Pawar, Narendra Modi, BJP, NCP

मुंबई : एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हल्लाबोल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी आता जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, मंगळवारी मुंबईत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी त्याचे पुन्हा प्रत्यंतर दिले. ‘राजकारणात विरोधात जाणाऱ्या शक्तींना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती आहे’, असा थेट आरोप पवार यांनी केलाच पण, नेहरू, गांधी कुटुंबांनी देशासाठी काय केले, असा प्रश्न करणाऱ्या मोदींना या कुटुंबांनी केलेल्या कार्याची जंत्रीच वाचून दाखवली.

‘मागील ५ वर्षांत मोदी यांची हुकूमशाही पाहायला मिळत असून, ते महाराष्ट्रात आले आणि शरद पवार यांच्याबाबत बोलले नाहीत, असे सध्या होत नाही. आता मी मोदींच्या राजकीय अजेंड्याविरोधात भूमिका घेतल्याने ते माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. आपल्याविरोधात बोलणाऱ्या शक्तींना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे’, असा आरोप पवार यांनी केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारार्थ खेतवाडीतील सभेत ते बोलत होते.

‘गांधी, नेहरू कुटुंबांवर मोदी यांचा हल्ला सुरू असून, त्यांनी देशासाठी काय केले असा प्रश्न मोदी विचारत आहेत. तथापि, स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी नेहरूंनी ११ वर्षे तुरुंगवास भोगला. नेहरूंनी दाखविलेला मार्ग चांगला असल्यामुळे भारतात हुकूमशाही आली नाही. राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कामगिरीची तर जगाने दखल घेतली आहे. राहुल गांधींच्या आजी आणि वडिलांनी तर देशासाठी बलिदान केले आहे’, असे पवार यांनी नमूद केले. ‘विकास हे लक्ष्य असल्याचे सांगणारे आता हिंदू धर्म धोक्यात असल्याचे बोलू लागले आहेत. काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाखाली राजकारण केले नाही असं देखील पवार म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या