15 May 2025 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN HFCL Share Price | 5 दिवसात दिला 22% परतावा, रोज तेजीने वाढतोय स्वस्त शेअर, खरेदीला गर्दी - NSE: HFCL Apollo Micro Systems Share Price | आज 5.59% टक्क्यांनी वाढला शेअर, जोरदार खरेदी सुरु, संधी सोडू नका - NSE: APOLLO BEL Share Price | स्वस्त झालेला डिफेन्स शेअर खरेदी करून ठेवा, संयम राखल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: BEL
x

विधानसभा: शिवसेनेच्या या मंत्र्यांचा सांगली पदाधिकारी मेळाव्यात पुन्हा स्वबळाचा नारा

Shivsena, BJP, Shivsena BJP Alliance, Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Minister Diwakar Raote

मुंबई: युतीचे गाडे अडलेले असतानाच, बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे बुधवारी नवी मुंबईत एकत्र आले होते. यामध्ये दोघांनीही ‘पुढील सरकार युतीचेच’ असा विश्वास व्यक्त केल्याने युतीचे संकेत मिळत आहेत. जागांचा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी रात्री मुख्यमंत्री व उद्धव यांची भेट निश्चित झाली होती. त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीतील नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार आहेत. ‘बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर येऊ शकतात अथवा उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात’, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रसार माध्यमांना दिली होती.

निवडणुका जिंकण्यापासून पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आणि कुणाला किती मंत्रीपदं मिळणार इथपासून कोण किती जागा लढवणार इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे. त्यामुळेच युती होणार की तुटणार? अशा प्रकारचं वातावरण सध्या राज्यात निर्माण झालं आहे. त्यातच दोन वेळा अमित शहांची युतीसंदर्भातली महाराष्ट्र भाजप नेत्यांसोबतची चर्चा रद्द झाली. कलम ३७०वर मुंबईत त्यांचं भाषण झालं, तेव्हा देखील ते यावर चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, तेव्हा ही चर्चा २६ सप्टेंबरला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. पण आजचा त्यांचा दौरा देखील रद्द झाल्यामुळे आता स्वत: मुख्यंमंत्रीच दिल्लीला चर्चेसाठी रवाना होणार आहेत.

दुसरीकडे शिवसेना स्बळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार असं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते म्हणाले आहेत. सागंलीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शिवसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून आम्ही यावेळी आमचं सामर्थ्य दाखवून देऊ आणि सगळे उमेदवार निवडून आणू असा विश्वास दिवाकर रावते यांनी बोलून दाखवला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप १६२ जागा तर शिवसेना १२६ जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर १४४ जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे. सांगलीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधामामुळे युतीत आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

या मेळाव्यादरम्यान, दिवाकर रावते यांनी कार्यकर्त्यांनाही चांगलंच खडसावलं. आपण शिवसेना पक्षातील आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला दक्ष असयला हवं. ११ च्या मेळाव्याला तुम्ही १२ वाजता उपस्थित राहिलात. मेळाव्याला उशिरा उपस्थित राहून मागे बसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात हार घाला असंही रावते म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या