2 May 2025 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

अंधेरी-पूर्व गणेशवाडी SRA घोटाळा; आकृती बिल्डर आणि MIDC अधिकाऱ्यांच्या संगनमताने? सविस्तर

Akruti Builders, SRA Scam, Akruti Hubtown, Akruti MIDC, Murji Patel, SRA Ghotala, MIDC Ganeshwadi

मुंबई: मुंबई अंधेरी पूर्व येथील गणेशवाडी परिसरातील आकृती बिल्डर संबंधित SRA घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. याबद्दलची सविस्तर हकीकत जाणण्यासाठी स्थानिक झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे समाजसेवक मनोज नायक यांनी समाज माध्यमांचा वापर करत एक पोस्ट शेअर केल्याने महाराष्ट्रनामा न्युजच्या प्रतिनिधीने संपूर्ण विषयाची पडताळणी केली.

दरम्यान, आमच्या प्रतिनिधीला प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून आकृती बिल्डर हा विकासक MIDC’च्या अखत्यारीतील अंधेरी (पूर्व) एमआयडीसी गणेशवाडी आणि आंबेडकर नगर येथे प्रकल्प राबवत आहे. प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, गणेशवाडी पॉकेट क्रमांक.५ येथे एकूण तीन बिल्डिंगचे काम सुरु असून, अद्याप केवळ २ बिल्डिंग तयार आहेत. विशेष म्हणजे १० वर्षांहून अधिक कालावधी उलटून देखील आकृती बिल्डरवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही.

तत्पूर्वी आकृती बिल्डरने, दरम्यानच्या कालावधीत आकृती सिटी, आकृती हब आणि आकृती निर्माण अशी कंपन्यांची वेगवेगळी नावं मागील २० वर्षात बदलण्यामागचे मूळ कारण यातील संगनमताने होतं असलेले घोटाळेच असल्याचं म्हटलं जातं आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी MIDC’चे मुख्य कार्यालय आणि आकृती बिल्डरचे मुख्य कार्यालय हाकेच्या अंतरावर आहेत. तरी देखील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचा ताबा आणि ९ वर्षांपासून आकृती बिल्डरने भाडे देखील थकवले असून देखील MIDC’चे अधिकारी आणि तसेच स्थानिक राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे आकृती बिल्डरवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे स्थानिक झोपडपट्टी धारकांच्या तक्रारी वाढल्याने आकृती बिल्डरने MIDC येथील कार्यालय इतरत्र हलवल्याचे समोर आलं. MIDC’चे उप निबंधक सुधीर आंबुरे यांच्या अंधेरी पूर्व येथील उदयोग सारथी या कार्यालयावर लोकांच्या तक्रारी एकूण न घेता, त्यांनी जवाबदारी झटकत कार्यालयाच्या दरवाजावर एक कागद लावला असून त्यावर कोणतीही तक्रार असल्यास आकृती बिल्डरचे ‘केवल वलंबिया’ या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देऊन थेट त्यांच्याशीच संपर्क करावा असं पत्रकात लावलं आहे आणि आमच्या प्रतिनिधीने देखील त्याची खात्री केली, जे खरं ठरलं.

यापूर्वी आकृती बिल्डरकडे असणारे मिश्रा यांच्याकडे असणाऱ्या माहितीनुसार गणेशवाडी येथे पॉकेट क्रमांक. ५ बिल्डिंग क्रमांक. १ आणि २ यांची अद्यापपर्यंत १०८ घरांची लॉटरी काढण्यात आली ती देखील स्थानिक विभागात न काढता थेट जोगेश्वरी येथे का काढण्यात आली त्याचे कारण समजू शकले नाही. तसेच MIDC’च्या कार्यालयात उप-निबंधक सुधीर आंबुरे यांच्या उपस्थितीत काही मोजक्याच लोकांना माहिती देण्यात आली आणि इतर झोपडपट्टी धारकांना कोणतीही पूर्व सूचना वा नोटीस न देताच सदनिकांच्या ड्रॉ काढण्यात आला.

तीन एसआरए बिल्डिंग’मध्ये एकूण ३०० सदनिका असून केवळ १४६ जणांना लॉटरी’मध्ये घर मिळाले आहे. इतर मूळ झोपड्पट्टीधारक आकृतीचे केवल वलंबिया यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते कोणताही पूर्व इतिहास माहित नसताना पात्र लोकांना देखील उडवाउडवीची उत्तर देतात. त्याला मूळ कारण म्हणजे MIDC’चे अधिकारी आणि आकृती बिल्डरसोबत हितसंबंध असलेले स्थानिक राजकीय नेते यांची मिलीभगत अशी चर्चा स्थानिक लोकांमध्ये रंगली आहे.

दरम्यान, आकृती बिल्डरच्या या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी आणि पात्र झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकांची एक समिती लवकरच संबंधित वरिष्ठांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे समजते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या