9 May 2025 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर

abhijeet banarjee, Nobel for economics, Amartya Sen

नवी दिल्ली: भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आणखीही दोन जणांना अर्थशास्त्रासाठी हा मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.

याआधी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनाही १९९८ मध्ये अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी भारतीय अर्थतज्ज्ञाला हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे. रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रामन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या