2 May 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
x

CAA: हा कायदा केंद्राचा आहे, तुझ्या बापाचे राज्य आहे का? शेलारांची उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका

BJP MLA Ashish Shelar, CM Uddhav Thackeray, CAA, NRC

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं देशातील कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. मी असं होऊ देणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असा घणाघात शेलारांनी केला. आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल”, असे टीकास्त्र शेलारांनी सोडलं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा’ या विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

तत्पूर्वी,‘नागरीकत्व सिद्धं करणं हा केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल’ त्यामुळे तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा प्रोमो हा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे CAA वरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होताना दिसतोय. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीचा तीसरा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला. या प्रोमोत CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं उत्तर दिलंय.

 

Web Title:  BJP MLA Ashish Shelar criticised CM Uddhav Thackeray over CAA implementation issue in Maharashtra.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या