3 May 2025 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले?

BJP Leader Sudhir Mungantiwar, Mahavikas Aghadi

मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारनं ५० कोटी वृक्ष लावण्याचा दावा केला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं विभागाचे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येईल. दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं.

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचं स्वागत केलं आहे. वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात ३३ कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला सरकारनं केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नेमकी किती वृक्षांची लागवड झाली याबद्दल अनेकांना संशय होता. वृक्षसंवर्धनाचं काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सरकारच्या दाव्याबद्दल त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले होते.

तत्पूर्वी, भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला होता. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाज माध्यमांच्या माध्यमातून केला होता.

दरम्यान, मागील ५ वर्षांपासून आधीच्या फडणवीस सरकारने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत हजारो कोट्यवधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले होते. मग, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राला स्थान का नाही? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

यावर त्यावेळी राष्ट्र्वादीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ‘सर्रास जंगलतोड होतेय. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी कोटींच्या संख्येने वृक्षलागवड करूनही महाराष्ट्राची जंगले समृद्ध झाली नसतील तर वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या मंत्र्यांनी हजारो कोटी फस्त करून जनतेची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं होतं. दरम्यान मागील वर्षात अनेकवेळा दिवसाला करोडो झाड लावल्याचा दावा वारंवार फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करत केला आहे. मात्र सरकारने खोदलेल्या लाखो विहिरींप्रमाणे, सध्या करोडो झाडं देखील गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Story ex Forest Minister Sudhir Mungantiwar welcomes decision of Mahavikas Aghadi to probe tree sapling.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या