आज देवळं बंद झालीत, पण खरं देवत्व सिद्ध करणाऱ्या पोलिसांना सलाम...कोणी म्हटलं?

मुंबई, १७ मार्च : कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात आज मोठी वाढ झाली नसली तरीही पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा ४१ एवढी झाली आहे. त्यात २७ पुरूष आणि १४ महिला असे ४० करोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यासंदर्भात अधिकृत ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केलं आहे.
सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आज करोनाचा पहिला बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६५ वर्षीय एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आणखी एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडल्याने राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० वर गेली आहे.
मात्र या सर्व परिस्थितीतही राज्यातील पोलीस प्रशासन देखील विशेष काळजी घेत आहे. तर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र जनतेच्या संरक्षणासाठी हे पोलीस घर कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत.
या कोरोनाला न घाबरता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस प्रशासनाला राष्ट्रवादीचे नेते राज्याचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी कौतुक केले आहे. ”कोरोनासारख्या आजाराला घाबरून घरात न बसता रात्रंदिवस कडक पहारा देऊन आमचं संरक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतील खऱ्या देवदूतांना खरोखर मुजरा. आज देवळं बंद झालीत, मात्र खरं देवत्व सिद्ध करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना सलाम.” असं ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.
कोरोनासारख्या आजाराला घाबरून घरात न बसता रात्रंदिवस कडक पहारा देऊन आमचं संरक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतील खऱ्या देवदूतांना खरोखर मुजरा. आज देवळं बंद झालीत, मात्र खरं देवत्व सिद्ध करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना सलाम. @AnilDeshmukhNCP @AjitPawarSpeaks pic.twitter.com/F18LmzIEWt
— Amol mitkari (@amolmitkari22) March 17, 2020
News English Summery: The state government is working on a ceasefire to prevent the outbreak of Corona. A mob has been imposed in some parts of the state, including Mumbai. But in all these cases, the police administration in the state is also taking special care. On the other hand, citizens have responded positively after the police called for a precautionary measure. But for the protection of the public, these police houses are doing their duty regardless of family. NCP leader Amol Mitkari, lauded the police administration for not acting intimidating this corona. “Truly, the true angels in Police uniforms who guard us by guarding us day and night, without fear of coronary disease, such as staying at home. The Temples are closed today, but salutations to the Maharashtra police who proved the true deity. ” This was tweeted by Amol Mitkari.
News English Title: Story NCP MLA Amol Mitkari appreciated Maharashtra police during Corona Crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH