4 May 2025 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

एक ट्विट आणि दादा सुपरहिट! गाडीचं स्टिअरिंग स्वतःकडे ठेवत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

Mahavikas Aghadi, photo Ajit Pawar, CM Uddhav Thackeray

मुंबई, २७ जुलै: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक फोटो ट्वीट करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच गाडीत बसले आहेत आणि या गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे. हा फोटो सध्या घडणाऱ्या घ़डामोडींच्या पार्श्वभूमीवर खूपकाही सांगून जाणारा आहे. या अनोख्या शुभेच्छांमुळे पुन्हा एकदा स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात आहे? अशी दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हा अतिशय लक्षवेधी आणि तितकाच बोलका फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे’.

दरम्यान, राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं होतं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या माने उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे. या सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय. केंद्रात किती चाकं आहेत. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर ३०-३५ चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडीच होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.

 

News English Summary: Today is the 60th birthday of state Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray. On the occasion of this birthday, Deputy Chief Minister Ajit Pawar has tweeted a photo and given unique wishes. His tweet has once again sparked discussion.

News English Title: Who exactly charge Mahavikas Aghadi government photo Ajit Pawar sparked controversy News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या