3 May 2025 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मीडियाने कसाबची सुद्धा एवढी मीडिया ट्रायल घेतली नसेल | जेवढी रियाची घेतली जातेय

Terrorist Kasab, Bollywood actress Swara Bhaskar, Rhea Chakraborty, Media Trial

मुंबई, २७ ऑगस्ट : सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडे असलेला तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली असून कसून तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. इतकेदिवस मीडियापासून दूर राहणारी रिया आता मीडियासमोर येऊन बाजू मांडत आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात तिने तिच्या एका चुकीबाबत सांगितले. ती म्हणाली की, तिने एक चूक केली होती. ती म्हणजे सुशांत सिंह राजपूतवर प्रेम केलं. ती म्हणाली की, याने काहीही फरक पडत नाही की, कोणती एजन्सी तपास करत आहे आणि कोण चौकशी करत आहे. पण तिच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. मात्र, रियाच्या मीडिया ट्रायलवरुन स्वरा भास्करने माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे.

मीडियाने कसाबचीदेखील एवढी मीडिया ट्रायल घेतली नसेल, जेवढी रियाची घेतली जातेय, असे म्हणत स्वराने मीडियाने याप्रकरणात दाखवलेल्या वृत्तांकनावर संताप व्यक्त केला आहे. मला नाही वाटत की कसाब हा देखील मीडियावर ‘Witch hunt’ चा एवढा मोठा विषय राहला होता. ज्याप्रकारे रिया चक्रवर्ती मीडिया ट्रायल सहन करत आहे, लाज वाटली पाहिजे भारतीय मीडियाला… या विषारी हिस्ट्रीरियाला सहन करणारी टॉकसिक जनतेचीही मला लाज वाटते, असे स्वराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लिहिले आहे.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, तिला याप्रकरणी अटकही केली जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यानुसार, रियाचे वडील इंद्रजित राहत असलेल्या त्यांच्या सांताक्रूझ येथील घराला प्रसारमाध्यमांनी गराडा घातला. त्यामुळे इंद्रजित यांनी ‘१००’ क्रमांक डायल करत याबाबत माहिती दिली. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथून हटविले, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

 

 

News English Summary: Bollywood actress Swara Bhaskar have come to the fore. She has expressed his displeasure and compared it with Kasab. Swara Bhaskar wrote on his official Twitter account- ‘I do not think Kasab would have been a subject of such a Witch Hunt on the media. Just like Rhea Chakraborty is facing a media trial.

News English Title: Kasab may not have had such a trial either, the intense indignation of the Bollywood actress Swara Bhaskar in support of Rhea Chakraborty News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या