पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर | पाकिस्तानचे ११ सैनिक ठार

जम्मू, १४ नोव्हेंबर: पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून (Indian Army) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. केरन, पुंछ आणि उरीमध्ये गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या राजदूतांना पाकिस्तान सरकारनं समन्स बजावलं आहे. याशिवाय काल रात्रभर सीमावर्ती भागात बेछूट गोळीबार सुरू आहे.
पाकिस्तानी हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानी लष्कराचे तंबू, खंदक आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे दर्शवणारी चित्रफित भारतीय लष्कराने प्रसारित केली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या माऱ्यासमोर पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांना पळ ठोकला. एकीकडे पाकिस्तानकडून हे लपवण्याचा प्रयत्न होत असला तरी पाकव्याप्त काश्मीरच्या काही नेत्यांनी भारतीय लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरात नीलम आणि लीपा क्षेत्रात आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची कबुली दिली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननं (Pakistani Newspaper Dawn) दिलेल्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरचे सिव्हिल डिफेन्स आणि आपात्कालिन व्यवस्था प्रकरणांचे सेक्रेटरी सय्यद शाहिद मोहयिद्दीन कादरी यांनी भारतीय लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरात नीलम, लीपा आणि मुजफ्फराबाद क्षेत्रातील नौसेरा सेक्टरमध्ये मोठं नुकसान झाल्याची कबुली दिली. नीलम खोऱ्यात भारताकडून आतापर्यंतचं सर्वात मोठं प्रत्युत्तर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी गेल्यावर्षीही पाकिस्तानच्या कुरापतींनंतर भारतीय लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरात मोठं नुकसान झालं गोतं.
दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी या आठवड्यात पाकिस्तान सैन्यानं दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. याआधी ७-८ नोव्हेंबरलादेखील पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या दरम्यान तीन दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या तिन्ही दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला.
News English Summary: Pakistan again violated the ceasefire near the Line of Control (LoC) in the Gurez to Uri area of Jammu and Kashmir on Friday. The Indian Army responded strongly to the Pakistani firing. India demolished Pakistani army bunkers and launch pads in Keran, Poonch and Uri. This action of India has divided Pakistan. The Indian ambassador has been summoned by the Pakistani government. Apart from this, indiscriminate firing started in the border areas last night.
News English Title: Heavy shelling from Pakistan and Indian army high alert on LoC News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL