देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ, तयार राहा | किती धोकादायक असेल हे सांगू शकत नाही - केंद्र सरकार

नवी दिल्ली, ५ मे | देशातील कोरोनाची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाहीये. या दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत इशारा दिला आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाटही येईल. विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर आहे. तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे, हे अद्याप माहिती नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार असले पाहिजे. राघवन बुधवारी कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते.
A phase three is inevitable, given the higher levels of circulating virus but it is not clear on what time scale this phase three will occur. We should prepare for new waves: K VijayRaghavan, Principal Scientific Advisor to Centre pic.twitter.com/c6lRzYaV2q
— ANI (@ANI) May 5, 2021
याच पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची प्रकरणे दररोज 2.4 टक्क्यांनी वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 प्रकरणे नोंदली गेली आहेत. 12 राज्यात एक लाखाहून अधिक, 7 राज्यात 50 हजार ते एक लाख आणि 17 राज्यांत 50 हजारांहून कमी सक्रिय प्रकरणे आहेत. 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा पॉझिटिव्ह स्तर 15% पेक्षा जास्त आहे. हे 10 राज्यात 5 ते 15% आणि तीन राज्यांत 5% पेक्षा कमी आहे.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये अधिक मृत्यू होत आहेत. बंगळुरूमध्ये गेल्या एका आठवड्यात जवळपास 1.49 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. चेन्नईमध्ये ही संख्या 38 हजार होती. काही जिल्ह्यात नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. यामध्ये कोझिकोड, एर्नाकुलम, गुडगाव यांचा समावेश आहे. 9 राज्यात 18+ लसीकरण सुरू झाले आहे. 18-44 वयोगटातील 6.71 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 16 कोटीहून अधिक डोस विनामूल्य दिले आहेत.
News English Summary: The second wave of corona in the country does not take the name of stopping. Meanwhile, the central government has warned of a third wave of corona. Vijay Raghavan, the government’s chief scientific adviser, said a third wave of corona would follow.
News English Title: Third Wave of corona in India is inevitable says expert in union govt news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN