2 May 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

राफेल डील निर्णय प्रक्रियेसंबंधी माहिती केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राफेल डील प्रकरणी झालेल्या निर्णय प्रक्रियेसंबंधी विस्तृत माहिती बंद लिफाफ्यातून केंद्र सरकारकडून मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशानुसार आज केंद्राने ती माहिती न्यायालयात सुपूर्द केली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी सुनिश्चित केली आहे.

दरम्यान, त्यामध्ये लढाऊ विमानाची कोणतीही तांत्रिक माहिती अथवा किंमतीच्या उल्लेखाची गरज नाही असे सुद्धा खंडपीठाने म्हटले होते. अखेर कोर्टाच्या या आदेशाला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कोर्ट सेक्रेटरी जनरल यांच्यामार्फत बंद लिफाफ्यातून ही महत्वाची गोपनिय माहिती न्यायालयाकडे सुपूर्द केली आहे असं वृत्त आहे.

राफेल लढाऊ विमानाच्या खरेदी करारावरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाला आहे. विरोधी पक्षांनी आणि विशेष करून काँग्रेसने सातत्याने या लढाऊ विमानांच्या वाढीव किंमतींचा तपशील विचारत मोदींना लक्ष केलं होत. त्यावर मोदी सरकारकडून सुद्धा अनेक प्रकारे स्पष्टीकरणे देण्यात आली आहेत. परंतु, तरी सुद्धा पूर्ण समाधान होत नसल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदींना वारंवार जाहीर सभांमधून आणि पत्रकार परिषदा घेऊन जाब विचारत आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात गेल्याने अनेक प्रश्नांची उत्तर बाहेर येऊ शकतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने विमानांच्या किंमतीचा उल्लेख करण्याची गरज नसल्याचे म्हटल्याने विरोधकांचं नक्की समाधान कस होणार असं अनेकांना वाटतं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x