26 April 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

२०१८-१९ अर्थसंकल्प ; नेते मंडळींना अच्छे दिन

नवी दिल्ली : २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात नेते मंडळींना अच्छे दिन आल्याचे आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्पष्टं झालं. त्यात विशेष करून खासदारांसाठी एक महत्वाची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत केली.

खासदारांच्या पगारवाढी साठी स्वतंत्र कायदा बनविण्यात येणार आहे आणि यापुढे खासदारांचे पगार केवळ ठराव पास करून वाढवता येणार नाहीत. त्या नवीन कायद्यामुळे खासदारांचे पगार ५ वर्षासाठी स्थिर राहतील आणि नंतर त्यात महागाई निर्देशांकानुसार बदल होईल असे जेटली यांनी संसदेला सांगितले. कारण एरवी एकमेकांना प्रखर विरोध करणारे खासदार सुध्दा पगार वाढ म्हटल्यावर एकमुखाने पाठिंबा द्यायचे, जे सामान्य माणसाला नेहमीच चकीत करणार असायचं. या कायद्यामुळे त्याला आळा घालता येईल.

खासदार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा;

खासदार पगार – ५० हजार रुपये

खासदार महिन्याला भत्ता ६० हजार रुपये.

खासदार महिन्याला मतदारसंघ भत्ता – ४५ हजार रुपये.

खासदार महिना कार्यालय भत्ता- ४५ हजार रुपये.

यांचे नवीन पगार पुढील प्रमाणे;

राष्ट्रपती : आधी १.५० लाख आणि नवीन ५ लाख
उपराष्ट्रपती : आधी १.१० लाख आणि नवीन ४ लाख
राज्यपाल : आधी १.१० लाख आणि नवीन ३.५ लाख

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x