27 April 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
x

राजकारण्यांनी कोणत्याही सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये : गडकरी

यवतमाळ : आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर रद्द केल्यामुळे वादात अडकलेल्या यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात राज्य सरकारचे चांगलेच खडे बोल सुनावले आणि राजकारण्यांना दोन मोलाचे सल्ले दिले.

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर पुन्हा रद्द करण्याच्या निर्णयामुळे मोठं राजकीय वादंग निर्माण झालं होतं. त्याच वादाचा धागा पडकून नितीन गडकरी यांनी साहित्यिक तसेच राजकारण्यांना सुद्धा अप्रत्यक्ष समंजस पणाचे सल्ले दिले.

दरम्यान, उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले, “राजकारण्यांनी साहित्य तसेच सांस्कृतिक संस्थांमध्ये अजिबात हस्तक्षेप करू नये. तसेच राजकारण्यांना सुद्धा सांस्कृतिक व्यासपीठ वर्जही असता कामा नये. मतभेद असायला अजिबात हरकत नाही, परंतु त्यांचे मनभेद असता कामा नये. कारण साहित्यिक हे आपल्या समाजाचे मार्गदर्शक असतात, असं सुद्धा ते म्हणाले.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x