28 April 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर लेख लिहिला म्हणून 'सौराष्ट्र हेडलाइन' वर्तमानपत्राचे संपादक आणि मालक यांच्या विरोधात एफआयआर दाखल

Saurashtra Headline Editor

Saurashtra Headline Editor | मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना काढून टाकण्याची शक्यता दर्शविणारा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल गुजरातमधील राजकोटस्थित ‘सौराष्ट्र हेडलाइन’ या राजकोटस्थित संध्याकाळच्या वर्तमानपत्राचे संपादक आणि मालक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तपासात सहभागी होण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत.

एफआयआर नोंदविण्यात आला :
भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ५०५ (१-बी) (सरकार किंवा सार्वजनिक शांतता विरूद्धच्या गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीस प्रवृत्त करणारी कृत्ये) आणि ५०५ (२) (अफवा किंवा सनसनाटी अहवाल प्रसारित करणे किंवा प्रकाशित करणे) अंतर्गत दोन दिवसांपूर्वी एफआयआर नोंदविण्यात आला होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी प्रसार माध्यमांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरून नाराजीवर वृत्त :
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कार्यपद्धतीवरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी असल्याचा उल्लेख करून पटेल यांच्याविरोधात संभाव्य हालचाली करण्याचे संकेत ‘सौराष्ट्र हेडलाइन’मधील लेखात देण्यात आले होते.

वृत्तपत्रात ‘गुडबाय भूपेंद्रजी, वेलकम रुपाला’ शीर्षक :
राजकोट शहर ए-डिव्हिजन पोलीस ठाण्याचे निरीक्षक सी.जी. जोशी म्हणाले की, २२ ऑगस्ट रोजी वृत्तपत्रात ‘गुडबाय भूपेंद्रजी, वेलकम रुपाला’ या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला होता, त्यानंतर वृत्तपत्राचे संपादक अनिरुद्ध नाकुम आणि त्यांच्या पत्नीविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला होता. हा लेख संपादकाने लिहिलेला आहे, तर वृत्तपत्र त्यांच्या पत्नीच्या मालकीचे आहे, असे ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Saurashtra Headline Editor under political action in Gujarat check details 28 August 2022.

हॅशटॅग्स

#Saurashtra Headline Editor(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x