15 May 2024 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Child Trafficking | यूपीत लहान मुलांची तस्करी करणारी टोळी पकडली गेली, पळवलेलं मुल भाजप नेत्याच्या घरी सापडलं

Child Trafficking

Child Trafficking | गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्टेशनवर आई-वडिलांच्या शेजारी झोपलेल्या 7 महिन्यांच्या मुलाला फिरोजाबादमधील भाजप नगरसेवकाच्या घरातून घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. भाजप नेता, तिचा पती आणि दोन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करून पोलिसांनी बाल तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात प्लॅटफॉर्मवरून मुलाला उचलताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्यक्तीचा समावेश आहे.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी मुलं चोरून विकण्याचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. मथुरेपासून 100 किमी अंतरावर असलेल्या फिरोजाबादमध्ये भाजपच्या नगरसेविका विनिता अग्रवाल आणि त्यांच्या पतीने दोन डॉक्टरांकडून 1.8 लाख रुपयांना बाळाला विकत घेतल्याचा आरोप आहे. या जोडप्याला मुलगा हवा होता कारण त्यांना आधी एक मुलगी आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यात प्लॅटफॉर्मवरून मुलाला उचलताना कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती देखील आहे.

रेल्वे पोलिस पत्रकार परिषद :
मथुरेत रेल्वे पोलिसांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिलं. यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरांकडून जप्त करण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडलही दाखवले. त्याचबरोबर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप नगरसेविकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पैशांसाठी तस्करी करणाऱ्या टोळीने हे अपहरण केल्याची माहिती पोलिस अधिकारी मोहम्मद मुश्ताक यांनी दिली. ते म्हणाले की, दीप कुमार नावाचा एक माणूस मुलाला घेऊन पळून गेला होता. तो एका टोळीचा सदस्य आहे ज्यात हाथरस जिल्ह्यात रुग्णालय चालवणाऱ्या दोन डॉक्टरांचा समावेश आहे. या टोळीत काही आरोग्य कर्मचारी आणि इतरांचाही समावेश आहे. ज्यांच्या घरी हे मूल सापडले त्यांनी सांगितले की, त्यांना एकच मुलगी आहे आणि त्यांना मुलगा हवा होता म्हणून मी बाळ विकत घेतलं, मात्र पोलिसांना लहान मुलांच्या तस्करी रॅकेटचा संशय पुढील तपास सुरु आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Child Trafficking from Mathura station found from house of BJP corporator arrested check details 30 August 2022.

हॅशटॅग्स

#Child Trafficking(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x