15 May 2024 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition | टेकनोचा जबरदस्त स्मार्टफोन, रंग बदलणारं बॅक पॅनेल, 64MP कॅमेरा आणि बरंच काही

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition | टेकनो आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या आगामी फोनचे नाव टेक्नो कॅमॉन १९ प्रो मॉन्ड्रीयन एडिशन असे आहे. गेल्या काही दिवसांपासून हा फोन खूप चर्चेत आहे. आता त्याची मायक्रोसाइटही अॅमेझॉन इंडियावर लाइव्ह झाली आहे. मायक्रोसाइटवर तर फोन लवकरच येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल :
अॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये याची विक्री सुरू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाइव्ह गेलेल्या मायक्रोसाइटमधील फोनच्या डिझाइनसोबतच त्याच्या खास फिचर्सचीही माहिती देण्यात आली आहे.

फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे बॅक पॅनेल. आपल्या शानदार डिझायनिंगमध्ये कंपनीने पॉलिक्रोमॅटिक फोटोसोमर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे फोनच्या बॅक पॅनलवरील प्रत्येक ब्लॉकचा रंग अनेक वेगवेगळ्या रंगात बदलत राहतो. कंपनी या तंत्रज्ञानाला सनलाइट ड्रॉइंग म्हणते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
फोनमध्ये कंपनी 1080×2460 पिक्सलच्या रिझॉल्यूशनसह 6.8 इंचाचा फुल एचडी + आयपीएस डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले 20.5: 9 चा आस्पेक्ट रेशियो आणि 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. विशेष म्हणजे कंपनी या फोनमध्ये ५ जीबी व्हर्चुअल रॅमही देत आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी96 चिपसेट पाहायला मिळेल.

फोटोग्राफीसाठी :
फोटोग्राफीसाठी या फोनच्या रियरमध्ये क्वाड एलईडी फ्लॅशसह ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स आणि लेझर ऑटोफोकस युनिट आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी मिळेल, जी 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tecno Camon 19 Pro Mondrian Edition on Amazon Grey Indian Festival Sale check details 06 September 2022.

हॅशटॅग्स

#Tecno Camon 19 Pro Mondrian Edition(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x