17 May 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा
x

बारामतीची जवाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर | महागाई रोखण्यात नापास झालेल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांमुळे सुप्रिया सुळेंचं मताधिक्य वाढणार

Loksabha Election 2022

Loksabha Election 2022 | महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याच्या तयारीत आहे. भाजप नेत्यांना राज्यातील १६ लोकसभेच्या जागा अत्यंत कठीण वाटत आहेत आणि यात पवारांचा (खासदार सुप्रिया सुळे) मतदारसंघ बारामतीचा समावेश आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा यांच्या कन्या सुप्रिया सुळे या येथून खासदार आहेत. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यावर भाजपने भर दिला असल्याचंही बोललं जात आहे.

मात्र भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत भाजपला लोकसभा निवडणूक अत्यंत कठीण आणि मोठ्या पराभासाठी कारणीभूत ठरणारी असणार आहे असा तो सर्व्हे सांगतो. हा सर्व्हे स्वतः भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी केल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपाला महाराष्ट्र आणि कर्नाटकत मोठ्या प्रभावाला सामोरं जावं लागणार आहे असं समोर आलं होतं. तसेच संकेत इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत देखील पाहायला मिळाले. शिंदेंच्या बंडानंतर भाजपचं सत्तेसाठी लोचट असल्याचं संदेश मतदारांमध्ये गेला आहे. परिणामी शिंदे गट आणि भाजपच्या अनेक खासदार आणि आमदारांना आगामी निवणुकीत मोठा राजकीय फटका बसणार आहे.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात पत नसणाऱ्या राजकारण्यांवर बारामतीची जवाबदारी :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पवारांकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले होते की, राजकारणात काहीही कायमचे नसते आणि नेत्यांचे गडही कधी ना कधी संपतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप देशात 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची तयारी करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यामध्ये त्यांनी बारामतीचाही उल्लेख केला. वास्तविक नितीश कुमार आणि शरद पवार देशपातळीवरील राजकीय घडामोडींमध्ये कार्यरत झाल्याने दिल्लीश्वरांच्या सांगण्यावर पवारांना आणि बारामतीवर बोलून स्वतःचा राजकीय वेळ वाया घालवत आहेत असं म्हटलं जातंय. केवळ हेडलाईन मॅनेजमेंट हाच त्यामागील राजकीय हेतू असल्याचं पत्रकारही जाणतात.

नुकतीच मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या युनिटला कठीण राजकीय क्षेत्रातही आक्रमकपणे काम करण्यास सांगितले होते. आता बारामतीत सुरू असलेली तयारी पाहून भाजप नेतृत्वाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जाब विचारला असल्याची माहिती आहे. त्यासाठी ती या परिसराला भेट देणार आहे. मात्र देशभरातील महागाई रोखण्यात नापास झालेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना यासाठी जवाबदारी देण्यात आली आहे की असाही त्या देशभरात कुठेही राजकीय झंझावात सभा घेत नाहीत आणि घेतल्या तर महागाई अजून अधोरेखित होईल हे अमित शहांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे बारामतीवर महत्वाच्या नेत्यांना वेळ वाया घालवू नये म्हणून राजकीय पत नसलेल्या आणि पदावर बसलेल्या नेत्यांवर भाजपने ही जवाबदारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जरी आल्या तरी पवारांची मतं अधिक वाढतील आणि त्याला कारण ठरेल प्रचंड महागाई असं तज्ज्ञ सांगतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election 2022 Baramati constituency check details 08 September 2022.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x