29 April 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाचा दणका, अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश, दंडही ठोठवण्यात आला

Narayan Rane

Union Minister Narayan Rane​​​| केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यात काही फेरफार करण्यात आले असून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच राणे यांना 10 लाखांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. राणे यांनी CRZ आणि FSI नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेला मिळाली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली होती. नारायण राणे यांनी महापालिकेची कोणतीही संमती न घेता हे बदल अंतर्गतरित्या केले आहेत असे तक्रार म्हटले होते.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं अधीश नावाचा बंगला आहे. या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथकाने १८ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात जाऊन तपासणी केली आणि नोटीसही बजावली.

आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai high court orders demolition of structure constructed by Narayan Rane at his Bunglow check details 20 September 2022.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x