2 May 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये
x

उत्तर प्रदेशात अपना दल भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत

Apana Dal, NDA, Narendra Modi, Amit Shah

लखनौ : एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भारतीय जनता पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. युपी’मध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे.

अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, ”भारतीय जनता पक्षाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही. अपना दलने भाजपाला २० फेब्रुवारीपर्यंत आपल्या तक्रारीचे निराकरण करण्याची डेडलाईन दिली होती. परंतु, भाजपाने आमच्या तक्रारींचे निवारण केलेले नाही. त्यामुळे आता अपना दल स्वतःचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. आता २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आम्ही पुढील निर्णय घेऊ.”

मात्र अनुप्रिया पटेल यांनी भाजपाने दिलेली आश्वासने आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा मुद्दा बनेल का असे विचारले असता अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, मला वाटत नाही की राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनेल. तसेच आगामी निवडणुकीत कुणाचे तिकीट कापायचे आणि कुणाला उमेदवारी द्यायची हा पूर्णपणे भाजपाचा अंतर्गत निर्णय असेल.”

उत्तर प्रदेशमध्ये अपना दल हा भाजपाचा सहकारी पक्ष आहे. केंद्रामध्ये अपना दलच्या कोट्यातून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्येही अपना दलचा एक मंत्री आहे. गेल्या काही काळापासून अपना दल भाजपावर नाराज आहे. यावेळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. २०१७ मध्ये अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. तसेच दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला होता.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x