1 May 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा?
x

भाजपने दीपोत्सवात मराठीच्या अपमानाचे दिवे लावले, विनंती करूनही राहुल देशपांडेंचं गाणं टायगर श्रॉफच्या एंट्रीला थांबवलं

Mumbai BJP Deepotsav

Worli BJP Deepotsav | भारतीय जनता पक्षाने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने दीपोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे. काल पासून २३ ऑक्टोबरपर्यंत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे. तर तिकडे ठाण्यातही दिवाळी कार्यक्रमासाठी शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या दीपोत्सव कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं सुरू होतं. या कार्यक्रमात टायगर श्रॉफची एंट्री झाल्यानंतर राहुल देशपांडे यांना गाणं थांबवण्यास सांगितलं. पाच मिनिटं गाणं थांबवा आम्हाला टायगरचा सत्कार करायचा आहे. त्यावर राहुल देशपांडे यांनी असं म्हटलं की मी जर ब्रेक घेतला तर मी गाणं म्हणणार नाही. मला २० मिनिटं गाऊ द्या त्यानंतर तुम्ही तुमचा सत्कार करा. मात्र तसं घडलं नाही. यावरूनच सचिन आहिर यांनी आता आरोप केला आहे भाजपने मराठी कलाकारांचा अपमान केला आहे.

सचिन अहिर यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे?
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!!भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे. मराठी कलाकारांची चेष्टा… असं ट्विट करत एक व्हीडिओ ट्विट केला आहे. भाजपने जो दीपोत्सव मुंबईतल्या वरळीत आयोजित केला आहे त्या कार्यक्रमातला व्हीडिओही सचिन अहिर यांनी ट्विट केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai BJP Deepotsav Tiger Shroffs entry and Rahul Seshpandes song stopped check details 20 October 2022.

हॅशटॅग्स

#BJP Mumbai(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x