11 May 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
x

Multibagger Stocks | चर्चा तर होणारच, बँक देते वर्षाला 6-7 टक्के व्याज, या शेअरने 1 वर्षात 350% परतावा दिला, स्टॉक नेम सेव्ह करा

Multibagger Stock

Multibagger Stocks| शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे भरघोस नफा कमावणे हा असतो. आज या लेखात आपण अशा स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या स्टॉक चे नाव आहे,” Finiotex chemical”. हा स्टॉक एका केमिकल कंपनीचा असून त्याने आपल्या गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस केला आहे. या कंपनीत पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आतापर्यंत साडेतीन पट परतावा कमावला आहे. या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनीही या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. त्यावेळी हा स्टॉक प्रति शेअर 409.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र, मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. त्यामुळे या शेअरची किंमत विक्रमी उच्चांक पातळीवरून 7 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. जून 2022 मध्ये, दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी या कंपनीचा 1.9 टक्के वाटा खरेदी केला होता. आता त्यांची एकूण गुंतवणूक सप्टेंबर 2022 पर्यंत वाढून 2.6 टक्के झाली आहे.

शेअरची वार्षिक कामगिरी :
Finiotex chemical या कंपनीच्या शेअर्सने 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 382.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीचे मार्केट कॅप सध्या 4,237 कोटी रुपये आहे. या कंपनीने नुकताच बाजार नियामकाला माहिती दिली आहे की, सकारात्मक तिमाही निकाल आणि वाढता व्यवसाय विस्तार या धोरणामुळे कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. या कंपनीच्या संचालक मंडळाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही ज्याचा शेअर्सच्या किमतीवर परिणाम होईल. जून तिमाहीत या कंपनीने 11.44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

कचोलिया यांची गुंतवणूक :
दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्याकडे सध्या या कंपनीचे 2.64 टक्के शेअर्स आहेत. याचा अर्थ आशिष काचोलीया यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे एकूण 29,24,072 शेअर्स आहेत. आशिष काचोलीया यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 40 कंपन्यांचे शेअर्स आहेत सामील आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य 1,831.4 कोटी रुपये आहे. आशिष यांच्या आवडत्या कंपन्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, इन्फ्रा, मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Finiotex ही एक उद्योग रासायन निर्मिती, कापड, बांधकाम, जल प्रक्रिया, खत, चामडे आणि रंग उद्योगांसाठी रसायने उत्पादन करते. ही कंपनी प्री-ट्रीटमेंट प्रक्रिया, डाईंग प्रक्रिया, प्रिंटिंग आणि फिनिशिंग प्रक्रियेसाठी उद्योगांना रसायने पुरवते. कंपनीचा व्यवसाय फक्त भारतातच नाही, तर पूर्ण जगभरात पसरला आहे. कंपनीच्या व्यापार रणनीतीमुळे, त्याच्या व्यवसायाचा विस्तारा मोठ्या प्रमाणात झाला आहे. हेच कारण आहे की, दिग्गज गुंतवणूकदारही या कंपनीत आपली गुंतवणूक वाढवत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Finiotex chemical share price return on investment on 29 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x