6 May 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

VIDEO: पीएनबी महा-घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते

Narendra Modi, Mehul Choksi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ नोव्हेंबर २०१५ रोजी तीन सुवर्ण योजनांचे उदघाटन करण्यात आले. सुवर्ण रोखे, सुवर्ण ठेव आणि सोन्याची नाणी अशा योजनांतून देशात पडून राहिलेले सोने चलनात आणण्याचा या योजनांमागील उद्देश होता. या योजनांच्या उद्घाटनाप्रसंगी नरेंद्र मोदींनी भाषण केले होते. या कार्यक्रमात गीतांजली जेम्सचा अध्यक्ष आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी हा देखील उपस्थित होता. ज्वेलरी क्षेत्रातील मोठे व्यापारी तसेच रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. २०१५ मध्ये नीरव मोदीचा घोटाळा उघड झाला नव्हता आणि त्यावेळी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही आघाडीचे हिरे व्यापारी होते. मोदींचा जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे तो याच कार्यक्रमातील आहे. या भाषणात मोदींनी मेहुल चोक्सीचा उल्लेख मेहुल भाई असा केला होता.

पीएनबी घोटाळ्यातील दुसरा आरोपी मेहुल चोक्सीने ४१ तासांचा विमान प्रवास करुन भारतात पोहोचणे अशक्य असल्याचे कोर्टात सांगितले आहे. ईडीने ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरुद्ध २ स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणीत दरम्यान मेहुल चोक्सीने त्यांच्या वकिलांमार्फत ३४ पानी उत्तर कळवले आहे. त्यात मेहुल चोक्सीने म्हटले आहे की, मी पीएनबी’ला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव याआधी दिला होता. दरम्यान, सदर विषयात अजून सुद्धा पत्रव्यवहार सुरुच आहे. मात्र, ईडीने ही बाब कोर्टापासून हेतु पुरस्कर दडवून ठेवली, असा दावा केला आहे.

परंतु याच मेहुल चोक्सीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तो भारतातून फरार होण्यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात “मेहुल-भाई” बोलले होते. याची कल्पना ईडीला होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. नरेंद्र मोदी मेहुल चोक्सीला ‘मेहुलभाई” बोलल्याचं व्हिडिओ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला होता आणि तोच व्हिडिओ आम्ही आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

नरेंद्र मोदी पीएनबी बँकेतील घोटाळ्यातील आरोपीचा उल्लेख मेहुल भाई असा करतात, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ पुन्हा ट्विट केला आणि व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x