26 April 2024 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

सोलापुरात मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर?

Loksabha Election 2019, NCP

नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघ माढा इथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. परंतु, त्यातदेखील माढ्याच्या जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. माढ्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोहिते पाटील प्रचंड नाराज आहेत.

आज विजयसिंह मोहिेते पाटलांनी दुपारी तीन वाजता शिवरत्न बंगल्यावर समर्थक आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावलीय. या बैठकीनंतर पक्ष सोडण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मोहिते कुटुंब भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे माढ्यातील आजच्या बैठकीकडे आणि मोहिते पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी माघारी घेतली काय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात खूप मोठी उलथापालथ झालीय. लोकसभा निवडणूक २०१९ च्या तोंडावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि शरद पवारांचे मित्र आणि जास्त जवळीक असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपा प्रवेश निश्चित झालाय. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांची बैठक घेऊन रणजितसिंह याना भाजपामध्ये प्रवेश देणार असल्याचं सांगितलंय.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x