7 May 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली
x

Anlon Technology Solutions IPO | हा IPO 447 पट अधिक सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, लिस्टिंगला मोठा परतावा?

Anlon Technology Solutions IPO

Anlon Technology Solutions IPO | सध्या शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होत आहे. गुंतवणुकदारांना 2023 या वर्षात पैसे लावण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. अशीच एक संधी अनलोन टेक्नॉलॉजी सोल्युशन लिमिटेड कंपनीने दिली होती. या कंपनीने आपला IPO गुंतवणूकीसाठी खुला केला होता. अनलोन टेक्नॉलॉजी सोल्युशन लिमिटेड कंपनीचा IPO 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि त्याची अंतिम मुदत 2 जानेवारी 2023 रोजी पूर्ण झाली. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. दरम्यान अनलोन टेक कंपनीचा IPO 447 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Bank Share Price | Anlon Technology Solutions Stock Price)

Anlon Technology Solutions Limited GMP :
अनलोन टेक कंपनीचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये 70 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील एका टॉप स्टॉक ब्रोकरने हा शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत असल्याची माहिती दिली आहे. ग्रे मार्केटमध्ये IPO स्टॉकचे अनऑफिशियल व्यवहार होतात. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, ही कंपनी लिस्टिंगच्या दिवशीच लोकांना जबरदस्त प्रॉफिट कमावून देऊ शकते. कंपनीने आपल्या IPO स्टॉकसाठी किंमत बँड 90 ते 100 रुपये जाहीर केली होती.

IPO बद्दल सविस्तर तपशील :
अनलोन टेक कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्था गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर NIIs साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 883 पट अधिक आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 447 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या लोकांच्या नजरा आता 5 जानेवारी 2023 वर लागल्या आहेत. या दिवशी IPO स्टॉकचे वितरण केले जाणार आहे. आणि अनलोन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 10 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Anlon Technology Solutions IPO GMP in focus check details on 04 January 2023.

हॅशटॅग्स

Anlon Technology Solutions IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x