29 April 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

BSF जवान उतरणार नरेंद्र मोदीं विरोधात रिंगणात?

BJP, Narendra Modi

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजे बीएफएस जवानांना मिळणाऱ्या हलक्या दर्जाच्या अन्नाचा भांडाफोड करणारे जवान तेज बहादूर यादव हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. विशेष म्हणजे तेज बहादूर यादव हे इतर कोणाविरुद्ध नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेज बहादूर यादव हे मोदींना वाराणसी मतदारसंघात आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मोदींविरोधात अपक्ष लढून सैन्यदलात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा मानस तेज बहादूर यादव यांचा आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

हरियाणातील रेवाडी इथे राहणारे तेज बहादूर यादव जानेवारी २०१७ मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी बीएफएस जवानांना मिळणाऱ्या हलक्या दर्जाच्या अन्नाबाबत समाज माध्यमांवर व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर बीएसएफने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केलं होतं. जवानांना चांगलं अन्न, जेवण मिळत नाही. उन, वारा, पावसात जवान सतत उभा असतो, परंतु त्याची हेळसांड होते, असा दावा तेज बहादूर यादव यांनी केला होता. त्यांचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. हे प्रकरण थेट गृहमंत्री राजनाथ सिंहांपर्यंत गेलं होतं.

तेज बहादूर यादव यांनी याचिका दाखल करत, सैन्यातील अधिकाऱ्यांवर आरोप केला होता. जवानांच्या अन्नपदार्थाच्या बजेटमध्ये सैन्यातील अधिकारी मोठा घोटाळा करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र या सर्व प्रकारानंतर तेज बहादूर यादव यांना निलंबित करण्यात आलं होतं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x