11 May 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये
x

Veerkrupa Jewellers Share Price | 8 महिन्यात या शेअरने मजबूत परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स दिले, आता स्टॉक स्प्लिट, डिटेल्स पहा

Veerkrupa Jewellers Share Price

Veerkrupa Jewellers Share Price | एका ज्वेलरी कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देणार आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे, म्हणजेच कंपनी प्रत्येक तीन शेअर्सवर दोन बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Veerkrupa Jewellers Share Price | Veerkrupa Jewellers Stock Price | BSE 543545)

बोनस शेअर वाटप :
शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकदारांना शेअर्स स्वस्तात खरेदी करता यावे यासाठी अनेक कंपन्या आपल्या धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करतात. बोनस शेअर्स म्हणजे कंपनीन आपल्या विद्यमान शेअर धारकांना अतिरिक्त शेअर्सचे वाटप करते. जेव्हा एखादी कंपनी बोनस शेअर्स जारी करते, तेव्हा शेअर धारकांना त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. कंपनीने जाहीर केलेल्या रेकॉर्ड तारखेपूर्वी शेअर्स धारण करणाऱ्या लोकांना बोनस शेअर्स मिळतात.

स्टॉक स्प्लिट घोषणा :
या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या कंपनीचे प्रत्येक विद्यमान शेअर्स 10 इक्विटी शेअर्समध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कंपन्या शेअर बाजारात आपल्या स्टॉकची तरलता वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिट करत असतात. रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे स्टॉक धारण करणाऱ्या लोकांना कंपनी स्टॉक स्प्लिटचा लाभ देते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
या कंपनीचे शेअर्स मागील वर्षी जुलै 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या तारखेपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 404.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या नवीन वर्षात शेअर्सची किंमत 55.24 टक्के मजबूत झाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.01 टक्के वाढीसह 131.95 रुपयांवर ट्रेड करत होते . वीरकृपा ज्वेलर्स कंपनी मुख्यतः चांदी, सोने, जडित आणि इतर दागिन्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसह सराफा व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना डिझायनर, पारंपारिक, आधुनिक आणि कॉम्बिनेशन डिझाइन्स सारख्या दागिन्यांच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Veerkrupa Jewellers Share Price 543545 stock market live on 11 February 2023.

हॅशटॅग्स

Veerkrupa Jewellers Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x