18 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या
x

शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारीवरून लोकांना विचलित करण्यासाठी मोदींची माणसं अयोध्येत दाखल? सामान्य जनता किती सतर्क?

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde on Ayodhya Visit | एकाबाजूला राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्यावर भीषण आर्थिक संकट कोसळलं आहे. तर एकूणच देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांनी रौद्र रूप धारण केल्याने सामान्य लोकांना दैनंदिन आयुष्य जगताना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प गुजरात निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातून एकरात्रीत कागदोपत्री गुजरातला पळविण्यात आले.

त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा धक्का बसला आहे. त्यात ज्या कोरोनाचं मार्केटिंग करत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांना लक्ष करत होते, तेच शिंदे आणि फडणवीस आता डोकं वर काढणाऱ्या कोरोना संकटाच्या कात्रीत अडकण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपच्या दिल्लीतील आदेशावरून लोकांना धार्मिक मुद्द्यावर केंद्रित करून शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारीवरून अशा विषयांना निवडणुकीच्या तोंडावर हवा मिळू नये म्हणून शिंदे गट आणि भाजप धडपड करत आहे असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आमदार, खासदार सोबतच भाजपचे नेते देखील शनिवारीच अयोध्येत पोहोचले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईहून शिवसैनिकांना घेऊन ट्रेन आज पहाटे अयोध्येमध्ये पोहोचली.

उत्तर भारतीय मतांसाठी राजकीय स्टंटबाजी :
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतं महत्वाची भूमिका बजावणार आहेत. मुंबईसह शिंदेंचं ठाण्यातही राजकीय अस्तित्व हे मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांवर अवलंबून आहे. त्यालाच अनुसरून शिंदे-भाजपने याचा इव्हेन्ट करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. त्याच हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील शिंदे-फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्यापासून दूर ठेवलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde on Ayodhya Visit check details on 09 April 2023.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x