12 May 2024 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Aether Industries Share Price| एथर इंडस्ट्रीज स्टॉक सकारात्मक बातमीच्या पार्श्वभूमीवर तेजीत आला, गुंतवणुकदारांना होणार फायदा, डिटेल पाहा

Aether Industries Share Price

Aether Industries Share Price | एथर इंडस्ट्रीज कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. या कंपनीने अमेरिकेतील आघाडीच्या जागतिक तेल क्षेत्र सेवा कंपनीसोबत MOU करार केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर एथर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त उसळी घेतली होती. एथर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 1023.15 रुपये किमतीवर क्लोज झाली होती.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाजार बंद झाला तेव्हा एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 982 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एथर इंडस्ट्रीज ही कंपनी आपल्या ग्राहकाच्या स्थानिक आणि जागतिक केमिकल्स उत्पादनाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम करते. एथर इंडस्ट्रीज ही भारतातील एक आघाडीची रासायनिक उत्पादन कंपनी आहे.

शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3.14 टक्के वाढीसह 1,013.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एथर इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा नवीन करार लेटर ऑफ इंटेंटच्या 3 महिन्यांच्या आत अंमलात आणणे आवश्यक आहे. एथर इंडस्ट्रीज कंपनीने स्ट्रॅटेजिक सप्लायर आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी हा MOU केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या करारामध्ये एकूण 4 उत्पादने सामील आहेत.

मागील एका वर्षात एथर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.08 टक्के वाढले आहेत. एथर इंडस्ट्रीज कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांनी मागील एका महिन्यात जबरदस्त कमाई केली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1050 रुपये प्रति शेअर होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Aether Industries Share Price today on 10 June 2023.

हॅशटॅग्स

#Aether Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x