11 May 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा
x

Vikas Ecotech Share Price| विकास इकोटेक स्टॉकमधील चढ उताराचे चक्र काही थांबेना! गुंतवणूकदारांनी काय करावे?

Vikas Ecotech Share price

Vikas Ecotech Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स 3.55 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Vikas Ecotech Share Price Today)

आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी हा स्टॉक 4.23 टक्के घसरणीसह 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. काल हा स्टॉक ओपनिंग नंतर काही तासात अप्पर सर्किट वर पोहचला होता, तर आज हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. (Vikas Ecotech Share Price BSE)

विकास इकोटेक या स्मॉल-कॅप कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनंतर स्टॉकमध्ये अचानक तेजी पाहायला मिळाली होती. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने भारतीय सेबीला कळवले आहे की, विकास इकोटेक लिमिटेड कंपनीला स्पेशालिटी पॉलिमर कंपाउंड्स डिव्हिजनकडून 90 दशलक्ष म्हणजेच सुमारे 9 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. नवीन ऑर्डर मिळणे, ही कंपनी आणि शेअर धारकांसाठी फायद्याची गोष्ट असते. यामुळे कंपनीचे आणि गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढते.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास इकोटेक कंपनीने स्पेशॅलिटी कंपाऊंड्समध्ये 197 दशलक्ष म्हणजेच 19.70 कोटीची विक्री नोंदवली आहे. विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. आज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव मोठ्या प्रमाणात असल्याने खरेदी ऑर्डर घटले आहे. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 4.15 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share price today on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x