19 May 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Rahul Gandhi in Manipur | नेता असावा जनतेच्या व्यथा ऐकणारा! मोदी निवडणूक इव्हेंटमध्ये व्यस्त, पण राहुल गांधी पोहोचले मणिपूरमध्ये

Rahul Gandhi in Manipur

Rahul Gandhi in Manipur | काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुरुवारपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मदत छावण्यांमध्ये जातीय हिंसाचारामुळे बेघर झालेल्या लोकांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर नागरी संघटनांशी ते संवाद साधणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यानंतर पंतप्रधान येथे येतील अशी हिंसाचारात होरपळणाऱ्या जनतेची अपेक्षा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ महिने होऊनही राज्यात सत्ता असताना फिरकले देखील नाहीत. तसेच अमेरीकेच्या दौऱ्यानंतर ते लगेच भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राहुल गांधी मणिपूरला पोहोचल्याने त्यांचं समाज माध्यमांवर खूप कौतुक केलं जातंय.

इंफाळला पोहोचल्यानंतर राहुल गांधी चुराचंदपूरला जातील, जिथे ते मदत शिबिरांना भेट देतील, अशी माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. त्यानंतर ते बिष्णुपूर जिल्ह्यातील मोईरंग ला भेट देतील आणि जातीय हिंसाचारात बेघर झालेल्या लोकांशी संवाद साधतील.

राहुल गांधी शुक्रवारी इम्फाळमधील मदत शिबिरांना भेट देतील आणि त्यानंतर काही सामाजिक संघटनांशी संवाद साधतील, असे काँग्रेस नेते म्हणाले. या वर्षी मे महिन्यात जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून मणिपूरमधील ३०० हून अधिक मदत छावण्यांमध्ये सुमारे 50,000 लोक राहत आहेत. राज्यात मेइतेई आणि कुकी समाजातील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मणिपूरमध्ये ३ मे रोजी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’चे आयोजन करण्यात आल्यानंतर हिंसक संघर्ष झाला आहे.

मणिपूरची ५३% लोकसंख्या मेइतेई समाजाची आहे
मणिपूरच्या लोकसंख्येत ५३ टक्के असलेला मेइतेई समाज प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. नागा आणि कुकी सारखे आदिवासी समुदाय लोकसंख्येच्या ४० टक्के आहेत आणि प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

News Title : Rahul Gandhi in Manipur for 2 days check details on 29 June 2023.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi in Manipur(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x