18 May 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

आप आणि BRS पक्ष भाजपची 'बी टीम'? 'BRS' महाराष्ट्रात आणि 'आप' मध्य प्रदेशात काँग्रेसची मतं फोडण्याच्या तयारीत

AAP Party

Upcoming Elections | मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ग्वाल्हेर चंबल हा भाग सध्या राजकारणाचा बालेकिल्ला बनत चालला आहे. भाजप आणि काँग्रेसपाठोपाठ सध्या सर्वाधिक सक्रिय असलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) वरिष्ठ नेते सध्या चंबळ भागात तळ ठोकून आहेत. ‘आप’च्या वाढत्या सक्रियतेमुळे कॉंग्रेससाठी तणाव वाढत असताना, या भागातील भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांमध्ये ‘आप’चे वर्चस्व टिकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी ग्वाल्हेर चंबल भागात राजकीय पक्षांची सक्रियता वाढली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या वतीने सर्व बडे दिग्गज येथे तळ ठोकून आपल्या कार्यकर्त्यांसह आणि नेत्यांसोबत रणनीती आखण्यात सातत्याने गुंतले आहेत. दरम्यान, या भागात तिसरा राजकीय पक्ष म्हणून उदयास येत असलेला ‘आप’ही इतर पक्षातील नाराजांवर नजर ठेऊन आहे. ‘आप’चे सर्व बडे नेतेही येथे बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी ग्वाल्हेरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येथे ते एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील. या जाहीर सभेला राज्यभरातून एक लाखाहून अधिक लोक सहभागी होतील, असा दावा पक्षाकडून केला जात आहे.

‘आप’ आणि BRS भाजपच्या ‘बी टीम’ असल्याचं समोर येतंय
मध्य प्रदेशात सध्या काँग्रेसची हवा असून चंबळमध्ये ‘आप’च्या आगमनानंतर काँग्रेसची चिंता सर्वाधिक वाढली आहे, जरी भाजप आणि काँग्रेसचे नेते ‘आप’च्या प्रवेशाने त्यांना काहीफरक पडणार नाही, असे सांगताना दिसत असले तरी प्रत्यक्षात ‘आप’ भाजपाची ‘बी टीम’ असून ते भाजपाच्या इशाऱ्यावर निवडणूक यंत्रणा राबवतात असा काँग्रेसने आरोप केला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाजप पेक्षा काँग्रेसमधील संधी मिळणार नसलेल्या नाराज नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आम आदमी पक्षाचे लक्ष आहे. तसेच ‘जहाँ भाजप खतरे मे, वहा आप मैदान में’ अशी राजकीय टोलेबाजी स्थानिक पातळीवर सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये निवडणुकीला केवळ ३-४ महिने शिल्लक आहे तिथे पक्ष आणि पक्ष संघटन उभं करण सहज शक्य नसतं. पण काही दिवस येईल केवळ काँग्रेसला डॅमेज करायचं हाच आप चा उद्देश असल्याचं स्पष्ट दिसू लागलं आहे. विशेष म्हणजे आम्ही भाजप विरोधी आहोत असे सांगणारे आप, BRS आणि वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांच्या हालचाली या भाजपाला पोषक असल्याचं राजकीय विश्लेषक सुद्धा सांगत असल्याने विरोधकांच्या दाव्याला सुद्धा बळ मिळत आहे.

News Title :  AAP Party will contest elections in Madhya Pradesh and BRS in Maharashtra 01 July 2023.

हॅशटॅग्स

#AAP Party(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x