18 May 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

मोदी एनडीएच्या बैठका बोलवतच कुठे होते? ते मित्रपक्षांना संपवण्यात व्यस्त होते, विरोधकांच्या एकजुटीला घाबरून त्यांना NDA आठवली आहे

Bihar CM Nitish Kumar

INDIA Vs NDA | बेंगळुरू येथे २६ विरोधी पक्षांची बैठक संपल्यापासून युतीच्या नव्या नावावर नाराजी व्यक्त करत स्वत:ला युतीचे संयोजक न बनविण्याच्या वृत्ताचे बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते नितीश कुमार यांनी स्वत: खंडन केले आहे.

बिहारच्या राजगीरमध्ये मालमास मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, विरोधी आघाडीचे संयोजक होण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमार नाराज होऊन बेंगळुरूहून परतल्याचा दावा केला होता. यावर उत्तर देताना नितीश कुमार म्हणाले की, या सर्व व्यर्थ गोष्टी आहेत, काही नेत्यांचे असे बोलणे कामच आहे. विरोधकांची एकजूट देशाच्या हिताची असून २०२४ नंतर चित्र बदलेल, असे ते म्हणाले.

नितीशकुमार पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांच्या बैठकीत आम्ही अनेक सूचना केल्या, त्यावर खूप चांगली सरकात्मक चर्चा झाली आणि सर्व काही एकमताने ठरविण्यात आले आहे. विरोधी आघाडीत फूट पडण्याच्या चर्चांवर नितीश कुमार म्हणाले की, चिंता करण्याचे कारण नाही, सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. आम्ही एकजूट आहोत, असे ते म्हणाले. बेंगळुरू येथील पत्रकार परिषदेपूर्वी पाटण्याला परतण्याच्या प्रश्नावर नितीश म्हणाले की, राजगीर संबधित सरकारी कामाचा आढावा घेण्याचा कार्यक्रम आधीच निश्चित होता, म्हणूनच आम्ही बेंगळुरू मध्ये सर्व विरोधकांना त्यांची माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे आम्ही एकत्रित पत्रकार परिषदेपूर्वी निघालो कारण फ्लाईटची वेळ ठरली होती. वास्तविक विरोधी पक्षांची एकजूट पाहून भाजप अस्वस्थ झाला आहे, भाजपची अवस्था बिकट झाली आहे हे त्यांच्या कालपासूनच्या आदळआपट मधून स्पष्ट होतंय असं नितीश कुमार म्हणाले.

नितीश कुमार पुढे म्हणाले की, भाजपवाले यापूर्वी कधीही एनडीएच्या बैठका बोलवत नव्हते, परंतु विरोधकांच्या बैठका पाहून भाजपाला NDA आठवली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ मध्ये एनडीएची स्थापना झाली तेव्हाच या बैठका झाल्या. मोदी सत्तेत आले आणि त्यानंतर बैठक कुठे सुरू होती? माझी संयोजक होण्याची इच्छा नाही, असे देखील नितीश कुमार म्हणाले.

नितीश कुमार म्हणाले की, विरोधकांना एकत्र आणणे हे माझे काम आहे आणि मी त्या विषयात व्यस्त आहेत. एनडीएतील ३८ पक्षांचा उल्लेख करताना नितीश म्हणाले की, त्यांची नावे बघा, अनेक नावे अशी आहेत. सकाळी जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांनी एनडीएच्या 38 पक्षांवर निशाणा साधत ईशान्य भारतात दोन डझन जागा आहेत आणि 38 पैकी 15-16 पक्षांना एकट्या ईशान्येकडील राज्यांमधून बोलावण्यात आले आहे अशी माहिती येताना NDA चं वास्तव उघड केले.

News Title : Bihar CM Nitish Kumar talked on NDA check details on 19 July 2023.

हॅशटॅग्स

#Bihar CM Nitish Kumar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x