13 May 2024 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

INDIA Vs NDA | विरोधकांच्या आघाडीला 'UPA'च म्हणा तर कधी 'घमंडिया' म्हणण्याचा सल्ला! मोदींनी 'इंडिया' आघाडीची धास्ती घेतल्याची चर्चा

INDIA Vs NDA 2024

INDIA Vs NDA 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बैठका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमध्ये युतीच्या घटक पक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नव्या विरोधी आघाडी ‘इंडिया’ वरही निशाणा साधत हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदीयांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए पक्षांच्या खासदारांची वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये विभागणी केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपासून या सर्वांची बैठक सुरू आहे.

‘घमंडिया’ म्हणा

‘इंडिया’ या नावावरून पंतप्रधान मोदी सातत्याने विरोधी आघाडीवर हल्ला चढवत आहेत. आता बातमी अशी आहे की, पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडीला ‘इंडिया’ ऐवजी ‘घमंडिया’ म्हणण्याचा अजब सल्ला दिला आहे. युतीचे नाव बदलणे म्हणजे विरोधी पक्षांवर, विशेषत: काँग्रेसवर यूपीएचा जुना विक्रम पुसण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी नव्या आघाडीवर केले आहेत. मात्र मोदींच्या या सल्ल्यावरून त्यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा किती धसका घेतला आहे याची देखील चर्चा सुरु झाली आहे.

विरोधकांच्या आघाडीला ‘यूपीए’ म्हणा

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले होते की, गरिबांवरील आपले दुष्कृत्य लपविण्यासाठी त्यांनी आपले नाव यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) वरून बदलून ‘इंडिया’ केलं आहे. ‘इंडिया’ हे नाव त्यांची देशभक्ती दाखवत नाही, तर देशाला लुटण्याचा हेतू दर्शवते. विशेष म्हणजे या विरोधकांच्या आघाडीला यूपीए म्हणण्याचा निर्णय भाजपने आधी घेतला होता. त्यामुळे स्वतः मोदी सुद्धा संभ्रमात असल्याचं म्हटलं जातंय.

एनडीएला दिला मंत्र

गेल्या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना जातीयवादाच्या राजकारणातून उठण्याचा सल्ला दिला होता. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल सांगितले की, स्थिर सरकारसाठी भाजपने दाखवलेल्या उदारतेचे ते उदाहरण आहेत. नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदाच्या लायकीचे नव्हते, कारण त्यांच्याकडे नेहमी कमी जागा होत्या, पण भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनवले. हा एनडीएचा त्याग आहे असा दावा देखील त्यांनी केला.

यावेळी पंतप्रधानांनी सहकारी पक्षांना सरकारच्या योजनांचे वर्णन एनडीएची योजना म्हणून करण्याचा सल्ला दिला आहे. केवळ एनडीएच स्थिर सरकार देऊ शकते, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना एनडीएच्या कामाचे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ शेअर करण्यास सांगितले आहे.

News Title :  INDIA Vs NDA 2024 Modi meet with NDA check details on 04 August 2023.

हॅशटॅग्स

#INDIA Vs NDA 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x