30 April 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर; मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक असलेल्या ५०% जागा भाजपने जिंकल्याने आश्चर्य

Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या आणि निकालाअंती मोठं यश प्राप्त करणाऱ्या भाजपच्या विजयासंदर्भात आता धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे. २०१४ मधील मोदी लाटांचा विचार केल्यास यंदा मोदी लाट नसताना देखील एकट्या भाजपने तब्बल ३०३ जागा तर भाजपप्रणीत एनडीएने एकूण ३५३ जागांवर घवघवीत यश प्राप्त केलं आहे. त्यात सर्वात महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट समोर येते आहे आणि ती म्हणजे भाजपने मोठ्या प्रमाणावर म्हणजे २५ टक्क्यांहून अधिक अल्पसंख्यांक असलेल्या तब्बल ५०% जागा जिंकल्या आहेत आणि त्यादेखील हिंदुत्वाचा मुद्दा रेटून.

दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे देशभरात भाजपने अशा तब्बल ७९ लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रित केले होते आणि तो देखील गैरमुस्लिम उमेदवार देऊन. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. या अल्पसंख्यांक असलेल्या मतदारसंघात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी आणि जैन समाजातील मतदारांचा आकडा सर्वाधिक आहे. युपीए १ मी,मधील सरकारपासून या मतदारसंघात आधीपासूनच सामाजिक कल्याणसारख्या विषयामार्फत येथे विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. अशा तब्बल ७९ लोकसभा मतदारसंघापैकी एकूण ४१ जागांवर भाजपने विजय प्राप्त केला आहे. आणि पूर्वीपेक्षा त्यांना १५ जागा अधिक मिळाल्या आहेत. मात्र त्याउलट काँग्रेसची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x