21 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

Gadar 2 Box Office Record | 'गदर 2'ने बॉक्स ऑफिसवर मोडला KGF 2 चा विक्रम, 'बाहुबली 2'ला मागे टाकले, काय आहे रेकॉर्ड?

Gadar 2 Box Office Record

Gadar 2 Box Office Record | ‘गदर 2’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तीन दिवसांत सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या या चित्रपटाने 130 कोटींचा आकडा पार केला आहे. एवढंच नाही तर अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने रविवारी ‘केजीएफ 2’ आणि ‘बाहुबली 2’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. मात्र, ‘गदर २’ अजूनही एका चित्रपटाच्या मागे आहे. कोणता? वाचा रविवारचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट.

गदर 2 ने आतापर्यंत इतकी कोटींची कमाई केली

‘गदर 2’ने पहिल्या दिवशी 40.1 कोटींची ओपनिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४३.०८ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी 20.71 टक्के वाढीसह 52 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच तीन दिवसांत या चित्रपटाने जवळपास 135.09 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘गदर 2’ या चित्रपटाला पराभूत करण्यात अपयशी ठरला

बॉक्स ऑफिसवर पहिल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानचा ‘पठाण’ या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो. ‘पठाण’ने पहिल्या रविवारी ५८.५ कोटींची कमाई केली होती. पण, ‘गदर 2’ने पहिल्या रविवारी ५२ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच ‘गदर २’ अवघ्या साडेसहा कोटी रुपयांत ‘पठाण’चा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला आहे. मात्र ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर ‘केजीएफ 2’, ‘बाहुबली 2’ आणि ‘टायगर जिंदा है’ला मागे टाकले आहे.

या चित्रपटांच्या पुढे

‘केजीएफ २’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या रविवारी ५०.३५ कोटी, प्रभासच्या ‘बाहुबली 2’ने ४६.५ कोटी, सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने ४५.५३ कोटी आणि आमीर खानच्या ‘दंगल’ने ४१.३४ कोटींची कमाई केली. तर ‘गदर 2’ने पहिल्या रविवारी 52 कोटींची नेट कमाई केली आहे.

News Title : Gadar 2 Box Office Record check details on 14 August 2023.

हॅशटॅग्स

#Gadar 2 Box Office Record(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x