28 April 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

लाव रे ती फुसकी लवंगी! सेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग खातं आल्याने समाज माध्यमांवर खिल्ली

MNS, Shivsena, Udhav Thackeray, Raj Thackeray

नवी दिल्ली : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.

असं असलं तरी शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार असलेलं हे अवजड उद्योग खातं जणू शिवसेनेचं पारंपरिक खातं भाजपने राखून ठेवलं आहे. अगदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन शिवसेनेचे हेवीवेट नेते मनोहर जोशी यांना केंद्रात पाठविण्यात आले तेव्हा देखील हेच खातं त्यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या या खात्यामुळे राज्यात किती अवजड उद्योग आले हा संशोधनाचा विषय असला तरी मनोहर पंतांचे सर्व खाजगी मात्र याच कार्यकाळात अवजड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मागील ५ वर्ष देखील शिवसेनेचे अनंत गीते यांना हेच खातं देण्यात आलं आणि त्यांनी नेमकं ५ वर्ष या खात्यामार्फत राज्याच्या विकासासाठी काय केलं हे स्वतः उद्धव ठाकरे देखील सांगू शकणार नाहीत.

त्यात आता पुन्हा १८ खासदार असून देखील तेच अवजड उद्योग खातं शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना देण्यात आलं आहे. दरम्यान, काल अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांनी फटाके फोडले खरे, मात्र त्यांना याची अजिबात माहिती नसावी की या खात्याचा आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी काहीच संबंध नाही आणि त्यामुळे त्याचा काहीच उपयोग मतदाराला होणार नाही, जसं मागील ३ टर्म झालं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आलेलं हे अवजड उद्योग खातं केवळ संबंधित मंत्र्यांनाच व्यक्तिशः फलदायी ठरल्याचा मनोहर जोशींपासूनचा इतिहास अबाधित राहील यात शंका नाही. अगदीच म्हणजे रामदास आठवले यांना देण्यात येणार समाज कल्याण खातं देखील उत्तम दर्जाचं आहे असं म्हणावं लागेल.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १८ जागा जिंकलण्याच्या आनंदात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लाव रे ते फटाके’ अशी खोचक प्रतिक्रिया देत मनसेला टोला लगावला होता. मात्र आज शिवसेनेचे १८ खासदार निवडून आलेले असताना आणि मोदी-शहांवर स्थुती सुमनं उधळून देखिल भाजपने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जागा दाखवल्याने समाज माध्यमांवर आता ‘लाव रे ती फुसकी लवंगी’ असं म्हणत नेटकरी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवत आहेत. विशेष म्हणजे रामविलास पासवान आणि इतर १-२ पक्षांचे ३-४ खासदार निवडून आलेले असताना त्यांना देखील चांगल्या दर्जाचं मंत्रालय बहाल करण्यात आल्याने शिवसेनेची खिल्ली उडवणारी चर्चा जोरदार रंगली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x