16 May 2024 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Precision Wires Share Price | मालामाल शेअर! अल्पावधीत 500 टक्के परतावा देणारा प्रिसिजन वायर्स इंडिया शेअर, पुढे किती फायदा?

Precision Wires Share Price

Precision Wires Share Price | प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत भरघोस परतावा कमावून दिला आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड ही एक वाइंडिंग वायर उत्पादक कंपनी असून, तिचे बाजार भांडवल 1,811.59 कोटी रुपये आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील तीन वर्षात प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 17 रुपयेवरून वाढून 102 रुपये किमतीवर पोहचली आहे. गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेसिजन वायर्स कंपनीचे शेअर्स 1.44 टक्क्यांच्या वाढीसह 102.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 102.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

4 सप्टेंबर 2020 रोजी प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स तेजीत आले, आणि गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 500 टक्के वाढून 6 लाख रुपये झाले असते.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 3 टक्के घसरणीसह 802.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीने 826.2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2023 तिमाहीमध्ये कंपनीने 16.5 कोटी रुपये निव्वळ कमावला आहे.

मागील वर्षीच्या जून तिमाहीत या कंपनीने 16.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8.50 टक्के वाढली आहे. तर 2023 या वर्षात शेअरची किंमत 35.39 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 69.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Precision Wires Share Price today on 09 September 2023.

हॅशटॅग्स

Precision Wires Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x