12 May 2024 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Avantel Share Price | मालामाल करणारा मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 341 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार

Avantel Share Price

Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 150 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.

या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड झाले आहेत. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स (Bonus Shares) वाटप करण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने 24 नोव्हेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी अवांटेल लिमिटेड स्टॉक 0.86 टक्के वाढीसह 129.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ज्या दिवशी कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेट निश्चित केली होती, त्याच दिवशी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. अप्पर सर्किट हीट करून अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 128.60 रुपये किमतीवर पोहचले होते. यापूर्वी 2022 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

ऑगस्ट महिन्यात या कंपनीने आपले शेअर्स 5 भागात विभाजित केले होते. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 2 रुपये किमतीवर आले होते. जून 2023 मध्ये अवांटेल लिमिटेड कंपनी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करत होती.

अवांटेल लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1 रुपये लाभांश देखील वाटप केला होता. मागील एका महिन्यात अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 291 टक्के वाढले असते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 341 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avantel Share Price NSE 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Avantel Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x