10 May 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

Kay Cee Energy IPO | स्वस्त IPO आला रे! प्राईस बँड 54 रुपये, पहिल्याच दिवशी 75 टक्के परतावा मिळू शकतो

Kay Cee Energy IPO

Kay Cee Energy IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. केसी एनर्जी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला (IPO Watch) करण्यात आला आहे. केसी एनर्जी अँड इन्फ्रा कंपनीचा IPO 28 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 51 ते 54 रुपये निश्चित करण्यात आली आहे. केसी एनर्जी कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. IPO GMP

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, केसी एनर्जी कंपनीचे शेअर्स 75 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केट प्रीमियम किमतीवरून असे कळते की, केसी एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह सूचीबद्ध होऊ शकतात.

केसी एनर्जी कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 51 ते 54 रुपये आहे. आणि स्टॉकचा ग्रे मार्केट प्रीमियम 40 रुपये आहे. यावरून हा स्टॉक 94 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत.

ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 75 टक्के मिळू शकतो. केसी एनर्जी कंपनीच्या IPO चा आकार 15.93 कोटी रुपये आहे. केसी एनर्जी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये फक्त 1 लॉट खरेदी करू शकतात.

एका लॉटमध्ये कंपनीने 2000 शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना केसी एनर्जी कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी 108000 रुपये जमा करावे लागतील. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

केसी एनर्जी कंपनीची स्थापना 2015 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः वीज पारेषण आणि वितरण प्रणाली संबंधित बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kay Cee Energy IPO GMP 29 December 2023.

हॅशटॅग्स

Kay Cee Energy IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x