15 May 2024 6:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! अल्पावधीत पैसा वाढेल, या शेअरने मागील 6 महिन्यांत दिला 233 टक्के परतावा

Bonus Shares

Bonus Shares | मागील एका वर्षात शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. या कंपन्यांच्या शेअर्सने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. मात्र अशा देखील काही कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा तर देतातच सोबत मोफत बोनस शेअर्स देखील देतात.

आज या लेखात आपण अशाच एका कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, एसजी मार्ट लिमिटेड. या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी एसजी मार्ट स्टॉक 2.00 टक्के वाढीसह 10,401.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शनिवारी सेबीला दिलेल्या माहितीत एसजी मार्ट कंपनीने कळवले आहे की, कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत देणार आहे. बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 22 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या लोकांकडे या कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्सचा लाभ देईल.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 10,197.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 233 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिनाभरापासून या कंपनीचे शेअर्स प्रॉफिट बुकींगला सामोरे जात आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्क्यांनी खाली आली आहे. एसजी मार्ट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5687 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on SG Mart Share Price BSE Live 12 February 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x