2 May 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

चॅरिटीच्या माध्यमातून पैसे जमा केले व दहशतवादी कृत्यासाठी वापरले; हाफिजला पाकिस्तानात अटक

Pakistan, hafiz saeed, jaish A Mohamaad

लाहोर : मुंबईवरील भ्याड २६/११ मधील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदला पाकिस्तानमधील लाहोर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद व त्याच्या एकूण बारा निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रकरणात सईदला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. परंतु, मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. तसेच, मागील महिन्यांपूर्वी त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यामुळे हाफिज सईदवरील या कारवाईमुळे भारताला मोठे यश मिळाले आहे.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x