16 May 2024 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Fineotex Chemical Share Price | असे शेअर्स निवडा! अल्पावधीत मिळेल 65 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग

Fineotex Chemical Share Price

Fineotex Chemical Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिनोटेक्स केमिकल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपर्यंत वाढले होते. नुकताच या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकवर अनेक विश्लेषकांनी ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने आपल्या महसूल संकलनात 40 टक्के वाढ नोंदवली आहे. ( फिनोटेक्स केमिकल लिमिटेड कंपनी अंश )

फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना 53.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारतात रासायनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या 140 कंपन्यांपैकी फिनोटेक्स केमिकल कंपनी 22 व्या क्रमांकावर आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी फिनोटेक्स केमिकल स्टॉक 1.50 टक्के वाढीसह 383.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 65 टक्के वाढून 571 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एफसीएल कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पहिल्या 9 महिन्यात स्टँडअलोन नफ्यात 101 टक्के वाढ नोंदवली आहे.

सध्या फिनोटेक्स केमिकल कंपनीचा स्टॉक आर्थिक वर्ष 2024/25/26 मध्ये EPS साठी अनुक्रमे 33x/25x/19x च्या PE गुणोत्तरांसह आशादायक मूल्यांकन पटीत ट्रेड करत आहे. चोक्सी रिसर्च फर्मच्या तज्ञांच्या मते, फिनोटेक्स केमिकल कंपनीचा PE मल्टिपल 30x वर सेट करण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 570 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 65 टक्के वाढू शकतो.

पुढील दोन वर्षात या कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये या कंपनीचा नफा 175 कोटी आणि 2025-2026 मध्ये 245 कोटी राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन वर्षात ही कंपनी त्यांच्या व्यवसाय इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये फिनोटेक्स केमिकल कंपनीने वार्षिक आधारावर 40 टक्के वाढीसह 524 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. यासह कंपनीचा EBITDA 58 टक्के वाढीसह 112 कोटी रुपयेवर पोहोचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fineotex Chemical Share Price NSE Live 11 April 2024.

हॅशटॅग्स

#Fineotex Chemical Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x