26 April 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

आयपीएस-आयएएस अधिकाऱ्यांना वाढीव वेळ मिळतो; आता मुख्यमंत्र्यांना देखील?

CM Devendra Fadnavis, Shivsena, BJP Maharashtra

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.

सत्तास्थापनेत मोठी कोंडी निर्माण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी प्रसार माध्यमांनी माहिती देताना ते म्हणाले की, राज्यपालांनी त्यांना अजून काही काळ काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी विराजमान राहण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कोणताही नवीन निर्णय घेता येणार नाही असं म्हटलं आहे.

तसेच शिवसेनेसोबत समसमान सत्तावाटपाबाबत काहीही ठरलं नव्हतं आणि लवकरच भाजपचाच मुख्यमंत्री बनेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र यावेळी त्यांचा मुख्य रोख हा शिवसेनेने मोदींचा वेळोवेळी कसा अपमान केला याची आठवण करून दिली आणि विरोधी पक्ष, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे तसेच प्रसार माध्यमांचे देखील आभार मानले आणि यावरून भाजप-शिवसेनेत अभूतपूर्व दरी निर्माण झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x