26 April 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
x

राज्यपालांकडून दुजाभाव; भाजपाला ७२ तासांचा तर सेनेला २४ तासांचा अवधी दिला: संजय राऊत

BJP, Shivsena, Shivsena MP Sanjay Raut

मुंबई: शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींकडून आम्हाला सत्ता स्थापन करण्यास कमी कालावधी मिळाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी भारतीय जनता पक्षाला ७२ तासांचा अवधी दिला होता. पण, शिवसेनेला केवळ २४ तासात सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक राज्यातील परिस्थिती पाहता, आम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही, असे म्हणत राऊत यांनी दुजाभाव झाल्याकडे लक्ष वेधलं.

राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असताना युतीची सत्ता राज्यात स्थापन न होण्याबाबत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर खापर फोडू नये असे राऊत म्हणाले. ही स्थिती भारतीय जनता पक्षाच्या अहंकारामुळे निर्माण झाली असल्याचे म्हणत राऊत यांनी या परिस्थितीसाठी भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवेसेनेविरुद्ध मोठे षडयंत्र रचले गेले असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळू नये वेळेप्रसंगी विरोधी पक्षात बसू असं षडयंत्र भारतीय जनता पक्षचं शिवसेनेविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे देशद्रोही नाही, सर्व पक्षाचे अन् नेत्यांचे राज्यासाठी आणि देशासाठी योगदान राहिलं आहे. सगळ्या नेत्यांच्या एकमेकांशी संवाद सुरु आहे. राजकीय स्थितीचं भान सगळ्यांना आहे. हे महाराष्ट्र राज्य आमचं आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे ही राजधानी ताब्यात राहावी असं कारस्थान सुरु आहे असाही आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.

राज्यात अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला आव्हान द्यावं यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकमत आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, भाजपा पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?,” असा सवाल राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असे सांगताना काही लोकांना राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आपण दोन्ही पक्षांना करत असल्याचे राऊत म्हणाले.

आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार असून शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्यांवर एकत्र येण्याचे काम सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये असे कालपर्यंत अनेक पक्ष म्हणत होते. आता त्यांच्यासाठी वेळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस-एनसीपीने योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन देखील खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x