26 April 2024 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

भाजपकडून प्रशांत किशोर यांच्याविरुद्ध तळतळाट; भाजप विरुद्ध मोठी रणनीती: सविस्तर वृत्त

Prashant Kishor, Shivsena, JDU, BJP

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या राजकारणानाच्या निमित्ताने एनडीए.मधील घटक पक्ष आणि भाजपनंतर सर्वाधिक खासदार असलेल्या शिवसेनेला मोदी सरकारने सातत्याने अपमानाची वागणूक दिली आहे आणि तीच २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कायम राहिली. एकूण राज्यातील शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा अभ्यास केल्यास राज्यात शिवसेना शिस्तबद्ध संपविण्याचा प्रकार सुरु होता आणि त्यात दिल्लीतील धुरंदर स्वतः सामील असल्याचं म्हटलं जातं होतं.

२०२४मध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मोठा राजकीय धक्का देण्याची योजना आखात होता. त्यासाठी आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसला हाताशी धरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप सेनेला अंधारात ठेऊन धक्का देण्याच्या योजना आखात असल्याचं अनेक तज्ज्ञांनी यापूर्वीच अधोरेखित केलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेनेला देखील काही सूचक इशारे देऊन विधानसभा निवडणुकीत सर्व आलबेल असल्याचं दाखवत राजकारणाचा गाडा हाकण्याचं सांगत, योग्य संधीची वाट पाहावी असे सल्ले देण्यात आले होते.

२०१९च्या लोकसभा निकालानंतर मोदी सरकार अजून उद्दाम झाले आणि त्यात बिहारमधील जेडीयू आणि महाराष्ट्रातील शिवसेनेची किंमत अजून कमी झाली. विशेष म्हणेज हे दोन्ही पक्ष एनडीए’मधील प्रमूख घटक पक्ष आहेत. मात्र, त्याच जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी २०१९ मधील राज्यातील विधासनभा निवडणुकीची शिवसेनेची प्रचाराची धुरा सांभाळली आणि भाजपसोबत राहून पुढची रणनीती शांतपणे सुरु ठेवली आणि योग्य संधीसाठी शिवसेनेला सूचना केल्याचं म्हटलं गेलं. नेमकं निकालानंतर तेच झालं आणि भाजप १०५ वर स्थरावलं आणि सत्तास्थापना अवघड झाली. इथेच शिवसेना सज्ज झाली आणि ऐतिहासिक निर्णय घेत आघाडीच्या दिशेने वेगाने धावू लागली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवून देण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या दिग्गज रणनीतीकारामुळेच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सत्तास्थापनेपासून दूर राहिल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेवरुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या महाभारतासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रणनीतीकार आणि जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाच्या राष्ट्रीय प्रभारी प्रिती गांधी यांनी प्रशांत किशोर यांना जबाबदार ठरवलंय.

“प्रशांत किशोर यांनी डुबवलं”, असं ट्विट प्रिती गांधी यांनी केलं आहे. तर, जदयूचे बंडखोर नेते अजय आलोक यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी किशोर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’मुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झालीये असं म्हटलं आहे. “काही दिवसांपासून शिवसेना एका रणनीतीकाराकडून ज्ञान घेत होती. परिणाम सगळ्यांसमोर आहे..”अशा आशयाचं ट्विट अलोक यांनी केलं आहे.

एकूणच शिवसेनेलासोबत घेत आणि जेडीयूने देखील प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून एनडीए’ला २०२४ पूर्वी धोबीपछाड देण्याची योजना आखली असून, भाजपाला एकाकी पाडून संपूर्ण एनडीए’मध्ये धावपळ घडवून आणण्याची योजना आहे. शिवसेनेमुळे इतर पक्ष देखील बंडाच्या भूमिकेत जातील, ज्याची सुरुवात झारखंडपासून सुरु झाली आहे आणि २०२४ मधील लोकसभा भाजपाला अशक्य होतील. मात्र मोठ्या खासदारांच्या संख्येवर शिवसेना केंद्रीय महाआघाडीत मोठे मंत्रालय घेऊन पुढील राष्ट्रीय राजकारणात पाय अजून घट्ट करेल असं राजकीय तत्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या धुरंदरांनी आतापासूनच प्रशांत किशोर यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x