29 April 2024 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

पालघर झेडपी: भाजप-मनसे युतीचा फायदा, मनसेचे दोन उमेदवार विजयी

Palghar ZP Election, MNS, Raj Thackeray

पालघर: पालघरमधील वाडा मतदारसंघामध्ये भाजपाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो असल्याचे समोर आले होते. या बॅनरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजपा आणि मनसेने युती केली असल्याची माहिती भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती.

पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहिर झाले असून यामध्ये गण- मन मतदार संघातून मनसेचे उमेदवार योगेश पाटील २००० मतांनी, तर वाडा मतदारसंघातून कार्तिकी ठाकरे १२०० मतांनी विजयी झाल्याने मनसे- भाजपा युतीमध्ये मनसेने पहिल्यांदा पालघर पंचायत समितीमध्ये खातं उघडलं आहे. त्यामुळे आता भाजपा आणि मनसे यांच्यात आणखी जवळीक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी जिल्ह्य़ात मंगळवारी सरासरी ६७ टक्के मतदारांनी मतदारांचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत झालेले भरघोस मतदान बघता धक्कादायक निकाल अपेक्षित होता. सकाळपासूनच धक्कादायक निकाल सुरू आहेत.

याबाबत सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावत म्हटलंय की, भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. परंतु, आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त केली त्याची दखल महाराष्ट्र घेईल असं त्यांनी सांगितले.

नागपूरातील भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जातं असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे.

नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

 

Web Title:  MNS party won two seat at Palghar ZP Election after making alliance with BJP.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x